कार्याने आपुल्या, अनेकांची जीवने सावरली...
आपल्याच प्रेरणेने देऊ, गरजूंना मायेची सावली...

एखादं झाड जेव्हा हिरव्यागार पानांनी, रंगीबेरंगी फुलांनी आणि रसाळ फळांनी बहरतं, आकार घेतं… तेव्हा ते स्वतापेक्षा इतरांसाठी मोठया आधाराची तजवीज करत असतं. म्हणूनच त्या झाडाचं मूळं खूपच खोलवर रुजलेलं असतात. मातीशी घट्ट नातं तयार करुन, ते झाड आपल्या पानांना आणि मुळांना मजबूत बनवतचं, पण त्यासोबत पुढच्या कित्येक पिढयासाठी रसाळ फळ-फुलांची आरास करून ठेवतं. मोजता न येण्याइतक्या पक्षांचं हक्काचं घर बनतं…असंच काहीसं साम्य ॲड. उदय गुलाबराव शेळके यांच्या व्यक्तिमत्वाशी आहे. त्यांचे मूळ संस्कारांनी आणि मूल्यांनी परिपूर्ण आहे, ज्यांचा भक्कम आधार म्हणजे सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांची तत्वे आणि विचार आहेत.
सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी आपलं संपूर्ण जीवन लोकांच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागातील तरुण पिढीच्या कल्याणासाठी समर्पित केलं होतं. ग्रामीण भागातील तरुणांचे भविष्य कसे उज्ज्वल होईल, हाच विचार नेहमी त्यांच्या मनात असे. तरूण पिढीला उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे त्यांचे स्वप्न होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, ॲड.उदय गुलाबराव शेळके यांनी जिद्दीने अनेक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

फाऊंडेशनचे प्रमुख उद्धेश

गेल्या ५ दशकांमध्ये काम करत असताना सहकार, शिक्षण, कृषी अश्या क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा शेळके परिवाराने नेहमीच प्रयत्न केला. शेळके परिवाराने जपलेला जनसेवेचा वसा आम्ही ह्या संस्थेद्वारे पुढे नेणार आहोत.

सामाजिक कल्याण

दुर्बल घटकांच्या जीवनात सुधारणा करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा हाच आमचा उद्देश

ग्रामीण विकास

ग्रामीण समुदायांचा सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शिक्षण आणि जीवनमानाच्या बाबतीत सर्वांगीण विकास घडवून आणणं

शिक्षण

विद्यार्थ्यांना जीवनातील विविध क्षेत्रांत यश मिळविण्यासाठी सखोल ज्ञान आणि कौशल्ये वाढवून युवा पिढीचं सशक्तीकरण करणं.

आरोग्य

राज्यातील नागरिकांना पुरेशी, गुणात्मक, प्रतिबंधात्मक व रोगनिवारक आरोग्य देखभाल सेवा उपलब्ध करून देणं.

कृषी

कृषी अभ्यासक्षेत्राचे अधिक विशेषीकरण करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सशक्त बनवणे.

महिला सशक्तीकरण

महिलांना त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक विकासाची जबाबदारी घेण्यास सक्षम करणं. आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावणे

फाऊंडेशनची प्रमुख तत्वे

व्हिजन

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची परिसंस्था निर्माण करणारे, महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारे, व्हिजन

मिशन

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित गरीब आणि गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी छोटेसे योगदान देण्याचे ध्येय

प्रेरणादायी

प्रेरणाच ध्येयापर्यंत पोहणचण्याची उमेद जिवंत ठेवते विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून यशाकडे वाटचाल

प्रत्येकाला हातभार लावायचा, समाजाला उंचावयाचं हेच आमचं ध्येय

अध्यक्षांच्या भावना

ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध होऊन त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, या उदात्त हेतूने जी. एस. महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके आणि त्यांचे चिरंजीव, जी. एस. महानगर बँकेचे अध्यक्ष ॲड.उदय गुलाबराव शेळके यांनी आयुष्यभर समाजसेवेचे कार्य केले. त्यांच्या या समाजसेवेच्या प्रवासाला पुढे नेण्याचा आणि त्यांनी समाजासाठी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याचा निर्धार मी केला आहे.

जी. एस. महानगर बँकेच्या आणि अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका पदाची धुरा सांभाळल्यानंतर ‘उदय गुलाबराव शेळके फाऊंडेशन’ या नावाने एक समाजसेवी संस्था स्थापन केली आहे, जी सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत आहे. सॉलिसिटर गुलाबराव शेळके आणि ॲड.उदय गुलाबराव शेळके यांनी नेहमीच समाजाच्या हिताचा विचार केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, तरुण पिढीचे उज्ज्वल भविष्य, शेतकऱ्यांचे हित आणि महिला सशक्तीकरणासाठी त्यांनी नेहमीच विविध प्रशिक्षण उपक्रम राबवले. या त्यांच्या विचारांना पुढे नेत, संस्थेमार्फत समाजाला सक्षम करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार आहेत.

गीतांजली उदय शेळके

आमचे प्रेरणास्थान

सॉलिसिटर गुलाबराव शेळके

सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी जीवनभर ग्रामीण तरुणांच्या भविष्याच्या उज्ज्वलतेसाठी कार्य केले आणि त्यांच्या उच्च शिक्षणाच्या सुविधांसाठी प्रयत्न केले. सहकार चळवळीच्या माध्यमातून त्यांनी गरीब आणि गरजू लोकांना आर्थिक आधार दिला. सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी ‘जी. एस. बँके’ची सुरुवात केली होती. पारनेर तालुक्यापासून सुरूवात केलेल्या या बँकेचं मुख्यालय मुंबईत आहे आणि आज ह्या बँकेच्या १५० हून अधिक शाखा आहेत. भारतातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून बँकेचा उल्लेख आज आहे. गुलाबराव शेळके ह्यांनी पेरलेल्या ह्या बीजाचे रूपांतर आज वृक्षात झाले आहे.

मान्यवरांच्या वाणीतून

उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन

पिंपरी ज़लसेन, ता पारनेर, जि. अहमदनगर 414302

आठवणीतील क्षण
सामाजिक क्षेत्रातील कार्य
माध्यमांनी घेतलेली दखल