- संपर्क : उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन - पिंपरी ज़लसेन, ता, पारनेर जि. अहमदनगर 414302
एखादं झाड जेव्हा हिरव्यागार पानांनी, रंगीबेरंगी फुलांनी आणि रसाळ फळांनी बहरतं, आकार घेतं… तेव्हा ते स्वतापेक्षा इतरांसाठी मोठया आधाराची तजवीज करत असतं. म्हणूनच त्या झाडाचं मूळं खूपच खोलवर रुजलेलं असतात. मातीशी घट्ट नातं तयार करुन, ते झाड आपल्या पानांना आणि मुळांना मजबूत बनवतचं, पण त्यासोबत पुढच्या कित्येक पिढयासाठी रसाळ फळ-फुलांची आरास करून ठेवतं. मोजता न येण्याइतक्या पक्षांचं हक्काचं घर बनतं…असंच काहीसं साम्य ॲड. उदय गुलाबराव शेळके यांच्या व्यक्तिमत्वाशी आहे. त्यांचे मूळ संस्कारांनी आणि मूल्यांनी परिपूर्ण आहे, ज्यांचा भक्कम आधार म्हणजे सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांची तत्वे आणि विचार आहेत.
सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी आपलं संपूर्ण जीवन लोकांच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागातील तरुण पिढीच्या कल्याणासाठी समर्पित केलं होतं. ग्रामीण भागातील तरुणांचे भविष्य कसे उज्ज्वल होईल, हाच विचार नेहमी त्यांच्या मनात असे. तरूण पिढीला उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे त्यांचे स्वप्न होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, ॲड.उदय गुलाबराव शेळके यांनी जिद्दीने अनेक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
ॲड.उदय गुलाबराव शेळके यांचं कार्यकुशल नेतृत्व आणि बँकिंग क्षेत्रातील दांडगा अनुभव हे शेतकऱ्यांसाठी आणि तरुण पिढीसाठी अमूल्य ठरले आहे. त्यांनी आपल्या कार्याने समाजाला एक नवीन दिशा दिली आणि ग्रामीण भागातील लोकांना नवा आत्मविश्वास दिला. सॉलिसिटर गुलाबराव शेळके आणि ॲड.उदय गुलाबराव शेळके यांनी ‘जी. एस. बँके’ची पायाभरणी केली होती. पारनेर तालुक्यापासून सुरूवात केलेल्या या बँकेचं मुख्यालय मुंबईत आहे आणि आज ह्या बँकेच्या १५० हून अधिक शाखा आहेत. २०२२ मध्ये ॲड.उदय गुलाबराव शेळके यांच्या अकाली निधनाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक सुवर्णपान हरपले.
सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या पावलावर पाऊल ठेवत ॲड.उदय गुलाबराव शेळके यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिले होते. त्यांचे कार्य आता ‘उदय गुलाबराव शेळके फाऊंडेशन’द्वारे पुढे सुरू राहणार आहे. समाजकार्य करताना त्यांनी ‘पानी फाऊंडेशन’सोबत उत्तम काम केले. आधुनिक शेतीसाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करून त्यांना मार्गदर्शन दिले. शिक्षणाच्या क्षेत्रात तरुण पिढीला कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले.
सामाजिक सेवा, क्षमता बांधणीची काळजी घेणं आणि एकात्मिक प्रणाली तयार करून प्रगतीशील राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणं.
पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार, अन्न आणि अशा विविध मुद्द्यांवर काम करून ग्रामीण भागातील विकास सुलभ करून शाश्वत आणि प्रगतीशील समाज निर्माण करणे.
"शिक्षण आणि सशक्तीकरणाद्वारे जीवन आणि समुदायांमध्ये बदल घडवून आणणे आणि सकारात्मक बदलाचा प्रभाव निर्माण करून उज्वल भविष्य घडवणे."
ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध होऊन त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, या उदात्त हेतूने जी. एस. महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके आणि त्यांचे चिरंजीव, जी. एस. महानगर बँकेचे अध्यक्ष ॲड.उदय गुलाबराव शेळके यांनी आयुष्यभर समाजसेवेचे कार्य केले. त्यांच्या या समाजसेवेच्या प्रवासाला पुढे नेण्याचा आणि त्यांनी समाजासाठी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याचा निर्धार मी केला आहे.
जी. एस. महानगर बँकेच्या आणि अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका पदाची धुरा सांभाळल्यानंतर ‘उदय गुलाबराव शेळके फाऊंडेशन’ या नावाने एक समाजसेवी संस्था स्थापन केली आहे, जी सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत आहे. सॉलिसिटर गुलाबराव शेळके आणि ॲड.उदय गुलाबराव शेळके यांनी नेहमीच समाजाच्या हिताचा विचार केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, तरुण पिढीचे उज्ज्वल भविष्य, शेतकऱ्यांचे हित आणि महिला सशक्तीकरणासाठी त्यांनी नेहमीच विविध प्रशिक्षण उपक्रम राबवले. या त्यांच्या विचारांना पुढे नेत, संस्थेमार्फत समाजाला सक्षम करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार आहेत.
गीतांजली उदय शेळके