सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी जीवनभर ग्रामीण तरुणांच्या भविष्याच्या उज्ज्वलतेसाठी कार्य केले आणि त्यांच्या उच्च शिक्षणाच्या सुविधांसाठी प्रयत्न केले. सहकार चळवळीच्या माध्यमातून त्यांनी गरीब आणि गरजू लोकांना आर्थिक आधार दिला. सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी ‘जी. एस. बँके’ची सुरुवात केली होती. पारनेर तालुक्यापासून सुरूवात केलेल्या या बँकेचं मुख्यालय मुंबईत आहे आणि आज ह्या बँकेच्या १५० हून अधिक शाखा आहेत. भारतातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून बँकेचा उल्लेख आज आहे. गुलाबराव शेळके ह्यांनी पेरलेल्या ह्या बीजाचे रूपांतर आज वृक्षात झाले आहे.